ईश्वराची प्रीती
१. ईश्वराचा सर्वाेच्च गुण प्रीती असल्याने ज्यांच्यामध्ये प्रीती अधिक असते, ते सुंदर दिसतात !
‘ज्यांच्यामध्ये प्रीती अधिक असते, ते सुंदर दिसतात. ईश्वराचा सर्वाेच्च गुण म्हणजे प्रीती ! पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती काळी असली, तरी ती सुंदर दिसते. विठ्ठलामध्ये सर्वांप्रती असलेल्या प्रीतीची एक प्रकारची आकर्षणशक्ती आहे. देवतांच्या मूर्ती बाह्यतः निर्जीव दिसल्या, तरी त्यांच्यात असलेल्या चैतन्यामुळे त्या सजीव आणि सुंदर दिसतात.
२. संत देवाचे सगुण रूप असल्याने ते सुंदर दिसतात !
संतांचेही असेच असते. ते देवाचे सगुण रूप असल्याने सुंदर दिसतात. त्यामुळे संत बाह्यतः कसेही दिसले, तरी ‘त्यांच्याकडे बघत रहावे’, असे वाटते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.४.२०२१)