श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना देवी सरस्वतीचा कृपाशीर्वाद लाभलेला असणे
महर्षींची दिव्य वाणी
‘हे कार्तिकपुत्री (टीप), आम्ही तुला ‘ज्ञानपुत्री’ म्हणतो. तुला देवी सरस्वतीचा कृपाशीर्वाद लाभलेला आहे. बुद्धी आणि ज्ञान हे दोन्ही वेगवेगळे आहे. तुझ्याकडे ज्ञान आहे. सरस्वती ही ज्ञानप्रदायिनी देवता आहे. सरस्वतीचा अखंड आशीर्वाद असल्यानेच तुला ज्ञान लाभले आहे.’ – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९८ (१५.४.२०२२))
(‘हे योग्य आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी १२ वर्षे ईश्वराकडून ज्ञानप्राप्ती करण्याची सेवा केली आहे. सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ७५ पेक्षा अधिक ग्रंथांचे त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत सहसंकलन केले आहे.’ – संकलक)
टीप – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा जन्म कृत्तिका नक्षत्रावर झालेला असल्याने महर्षि त्यांचा उल्लेख ‘कार्तिकपुत्री’ असा करतात.