अमरावती येथे मांत्रिक अब्दुल रहीम याच्या अघोरी उपचारांमुळे तरुणाचा संशयास्पद मृत्यू !
अमरावती, २६ मे (वार्ता.) – येथील बेलपुरा परिसरात रहाणाऱ्या रितिक गणेश सोनकुसरे याचा आर्वी येथे मांत्रिकांच्या अघोरी उपचाराच्या वेळी मृत्यू झाला.
यासंदर्भात मृतकाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी मांत्रिक अब्दुल रहीम आणि त्याची दोन मुले अब्दुल जुनेद अन् अब्दुल जमीर यांना अटक केली आहे.
रितिक सोनकुसरे हा मानसिक व्याधीमुळे त्रस्त होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यावर विविध ठिकाणच्या मांत्रिकांकडून उपचार करून घेतले होते. त्यांनी रितिकला आर्वी येथील मांत्रिक अब्दुल याच्याकडे तांत्रिक उपचारासाठी नेले होते. काही दिवसांनी मांत्रिक पिता-पुत्रांनी रितिकला आर्वी येथे उपचार करण्यासाठी बोलावून घेतले. कालांतरानंतर सोनकुसरे कुटुंबियांनी मांत्रिकांना संपर्क केल्यावर त्यांनी उपचाराच्या काळात रितिकचा मृत्यू झाल्याचे सांगितले; पण याविषयी मांत्रिकांनी आर्वी पोलिसांना काहीच कळवले नाही.
रितिकचा मृतदेह घरी आणल्यानंतर गळा दाबल्याप्रमाणे बोटे उमटल्याचे दिसत होते. हे संशयास्पद वाटल्याने रितिकच्या कुटुंबियांनी मांत्रिकांच्या विरोधात पोलीस तक्रार प्रविष्ट केली. मांत्रिक पिता-पुत्रांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. रितिकच्या मृतदेहाचा उत्तरीय तपासणी अहवाल अद्याप यायचा आहे.
संपादकीय भूमिकामांत्रिक हा मुसलमान असल्याने त्याच्या विरोधात संपूर्ण पुरो(अधो)गामी टोळी मौन बाळगून आहे, हे लक्षात घ्या ! |