राज्यसभेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा !
मुंबई – राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घोषित केले. या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती; परंतु संभाजीराजे यांनी पक्षप्रवेशाची अट मान्य न केल्याने शिवसेनेने या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली. राज्यात शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. खासदार म्हणून निवडून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे पहिले उमेदवार संजय राऊत हे शिवसेनेच्या मतांनी निवडणून येणार आहेत; मात्र संजय पवार यांना निवडून येण्यासाठी महाविकास आघाडीच्या मतांची आवश्यकता लागणार आहे. २६ मे या दिवशी संजय राऊत आणि संजय पवार हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.