नागरिकांनी प्लास्टिक कचरा गटारात टाकू नये !
|
सांगली, २५ मे (वार्ता.) – महापालिकेच्या वतीने पावसाळापूर्व नालेसफाईची मोहीम चालू आहे. भूमीगत गटारांमध्ये नागरिकांनी प्लास्टिक कचरा टाकल्यामुळे भूमीगत गटारांचे चेंबर तुंबलेले आहेत. प्रत्येक चेंबरमधून प्लास्टिक कचरा निघत असल्यामुळे नागरिकांनी तो गटारामध्ये न टाकता महापालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.