मुंबईमध्ये दुचाकीवरील दोघांनीही शिरस्त्राण घालणे बंधनकारक !
मुंबई – मोटार वाहन नियमानुसार दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती यांना शिरस्त्राण वापरणे बंधनकारक आहे. मुंबईमध्ये या नियमाची कार्यवाही चालू करण्यात आली आहे. सध्या याविषयी पोलीस जनजागृती करत असून प्रत्यक्ष कारवाई १५ दिवसांनी चालू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक वाहतूक पोलीस मुख्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, विना शिरस्त्राण दुचाकी चालवल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड, तसेच ३ मासांसाठी वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे.