केरळमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती यांच्या विरोधात मुसलमान मुलाची घोषणाबाजी !
पी.एफ्.आय.च्या मोर्च्यामध्ये समाजविघातक घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अटक
अलपुझा (केरळ) – येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेच्या एका मोर्च्यामध्ये एका मुलाने हिंदु आणि ख्रिस्ती यांच्या विरोधात द्वेषपूर्ण आणि विखारी घोषणा दिल्या. ‘हिंदूंनो, तुम्ही तुमच्या अंत्यविधीसाठी भात सिद्ध ठेवा.(हिंदूंच्या अंत्यसंस्कारात भाताचे पिंड बनवले जातात.) ख्रिस्त्यांनो, तुमच्या अंत्यसंस्कारासाठी तुम्ही धूप सिद्ध ठेवा. तुम्ही शांतपणे येथे रहाणार असल्यास येथे राहू शकता; मात्र तसे रहाणार नसल्यास ‘आझादी’ कशी मिळवायची, हे आम्हाला ठाऊक आहे’, अशा घोषणा मुसलमान मुलगा देत होता. या वेळी मोर्च्यात सहभागी पी.एफ्.आय.चे अन्य कार्यकर्तेही विखारी घोषणा देऊन ‘हिंदू आणि ख्रिस्ती यांनी आम्ही सांगितल्यानुसार येथे न राहिल्यास तुम्ही मरणाला सिद्ध व्हा’, अशा घोषणा देण्यात येत होत्या. या घोषणा दिल्यावरून या संघटनेच्या एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. याविषयीचा एक व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पी.एफ्.आय.च्या मोर्च्यापूर्वी रा.स्व. संघाने येथे मोर्चा काढून जिहादी आतंकवादाचा विरोध केला होता.
केरळच्या बाल अधिकार आयोगानेही या प्रकरणी एक गुन्हा नोंदवला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष श्री. प्रियंक कानूनगो यांनी या प्रकरणी म्हटले की, या प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे. मुलांकडून घोषणाबाजी करून घेणे ‘बाल श्रम कायद्या’चे उल्लंघन आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात येईल.
संपादकीय भूमिका
|