दाऊद इब्राहिमच्या बहिणीचा अंगरक्षक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता !
अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या चौकशीत माहिती आली समोर
मुंबई – दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिचा अंगरक्षक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता, अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. गोवावाला कंपाऊंड इमारतीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या जबाबात मलिक यांनी ही माहिती दिली. सलीम पटेल असे त्याचे नाव असून तो चालक म्हणूनही तिच्याकडे काम करत होता. तो तिचा जवळचा सहकारीही होता.
गोवावाला कंपाऊंड इमारतीच्या संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेल याला नवाब मलिक यांच्याकडून १५ लाख रुपये मिळाले होते. यातील दुसरा आरोपी सरदार शाहवली खान याला ५ लाख रुपये, हसिना पारकर हिला रोख ५ लाख रुपये आणि ५ लाख रुपयांचा धनादेश असे पैसे देण्यात आले होते. हे पैसे नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि भाऊ अस्लम मलिक यांच्यासमोर देण्यात आले होते, अशीही माहिती समोर आली आहे.
संपादकीय भूमिकाहे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे स्वरूप ! |