(म्हणे) ‘श्रीकृष्णजन्मभूमी न्यास नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठच याचिका प्रविष्ट करत आहेत !’
श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणी मुसलमान पक्षाचा आरोप
मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्यात वर्ष १९६८ मध्ये मुसलमान पक्षाशी झालेल्या करारावर श्रीकृष्णजन्मभूमी न्यासाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले नसून बाहेरील लोकच त्या विरोधात याचिका प्रविष्ट करत आहेत. याचिकाकर्ते प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते न्यासाच्या वतीने बोलत आहेत, असे वाटते, असे वक्तव्य मुसलमान पक्षाचे अधिवक्ता तनवीर अहमद यांनी केले.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरांच्या मुक्तीसाठी हिंदूंकडून कुणीही याचिका प्रविष्ट करू शकतो. त्यावर मुसलमान पक्षाने आक्षेप घेण्यासारखे काय आहे ? अयोध्येप्रमाणेच काशी आणि मथुरा येथे पूर्वी हिंदूंची मंदिरे होती, हे सत्य असतांना मुसलमान ती हिंदूंकडे का सोपवत नाहीत ? याविषयी त्यांनी बोलले पाहिजे ! |