मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणाशी विवाह केल्याने तिच्या जिवाला धोका
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे एका मुसलमान तरुणीने धर्मांतर करून हिंदु तरुणाशी विवाह केला. ‘यामुळे माझ्या जिवाला माझ्या कुटुंबियांकडून धोका निर्माण झाला आहे’, असे या तरुणीने म्हटले आहे. ‘लुबना’ नाव असणार्या या तरुणीने हिंदु धर्म स्वीकारल्यावर ‘आरोही’ नाव धारण केले आहे. तिने बॉबी नावाच्या तरुणाशी विवाह केला आहे. आरोहीने व्हिडिओ प्रसारित करून पोलीस आणि प्रशासन यांच्याकडेन स्वतःच्या आणि पतीच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
सौजन्य युपी तक
१. आरोही आणि बॉबी हे एकाच परिसरात रहातात. या दोघांचे एकमेकांवर अनेक वर्षांपासून प्रेम आहे. २० मे या दिवशी त्यांनी मंदिरात हिंदु पद्धतीनुसार विवाह केला. आरोही म्हणाली, ‘‘मला इस्लाम धर्म आवडत नाही. इस्लाममध्ये धर्मात तिहेरी तलाक आणि हलाला आहे. मी बुरखा आणि हिजाब सोडला आहे.’ ‘हलाला’ म्हणजे तलाक दिल्यानंतर पुन्हा त्याच पतीशी विवाह करायचा असल्यास दुसर्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे होय.
२. बॉबीने सांगितले की, आरोहीच्या कुटुंबियांकडून माझ्या कुटुंबाचा छळ केला जात आहे. आमचा विवाह करून देणार्या पुरोहिताच्याही जिवाला धोका आहे.
संपादकीय भूमिकाहिंदु तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह केला, तर ते ‘प्रेम’ आणि मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केला, तर तो ‘धर्मद्रोह’ हे लक्षात घ्या ! |