अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे क्रूर शासन येणे, बांगलादेशातील हिंदूंवर झालेले आक्रमण या घटना विश्व तिसऱ्या जागतिक महायुद्धाकडे वाटचाल करत असल्याचे द्योतक असणे
महर्षींची दिव्य वाणी
‘तिसरे जागतिक महायुद्ध जवळ आले आहे. ‘युद्ध म्हणजे दोन गटांमधील युद्ध किंवा दोन देशांमधील युद्ध’, असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात हे धर्म आणि अधर्म यांतील युद्ध आहे. तिसऱ्या विश्वयुद्धाची परिभाषा निराळी आहे. यामध्ये निसर्गाच्या प्रकोपामुळे म्हणजे अतीवृष्टी, पूर, वादळ, भूकंप, ज्वालामुखी, वणवा पेटणे, आग लागणे, विजा पडणे इत्यादींमुळे कोट्यवधी लोक मृत्यू पावतील. हाही युद्धाचाच भाग असेल. येणाऱ्या काळात आखाती देश एकमेकांमध्ये भांडतील आणि येथील लोक एकमेकांना मारतील. हाही तिसऱ्या विश्वयुद्धाचा भाग असेल.
‘ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे क्रूर शासन येणे, ऑक्टोबर २०२१ मधील नवरात्रीच्या काळात बांगलादेशातील हिंदूंवर झालेले आक्रमण आणि भारत अन् चीन यांमध्ये चालू असलेले शीतयुद्ध’, या सर्व घटना विश्व तिसऱ्या जागतिक महायुद्धाकडे वाटचाल करत असल्याचे द्योतक आहेत.’
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९० (२१.१०.२०२१))