‘सी.एम्.पी.’ प्रणालीद्वारे एका ‘क्लिक’वर मासाच्या १ तारखेला शिक्षकांना मिळणार वेतन !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर, २४ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील ९ सहस्र ४३३ प्राथमिक शिक्षकांचे ‘सी.एम्.पी.’ प्रणालीद्वारे वेतन जमा होणार आहे. राज्यात शिक्षकांना वेळेत वेतन देणारी सोलापूर जिल्हा परिषद अग्रणी आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात ‘सी.एम्.पी.’ प्रणालीद्वारे प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख अशा एकूण ९ सहस्र ४३३ जणांचे वेतन दिलीप स्वामी यांच्या हस्ते एका ‘क्लिक’द्वारे जमा करण्यात आले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, लेखाधिकारी रामचंद्र पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये १८ सहस्रांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी काम पहातात. शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख अशा ९ सहस्र ४३३ कर्मचार्‍यांना वेतनासाठी १० ते १५ दिवस वाट पहावी लागत होती. यातील सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून, तसेच सर्व कपात रक्कम वजा करून निव्वळ वेतन शिक्षकांच्या खात्यावर १ तारखेला जमा होणार आहे.