काश्मीरला भारतापासून तोडण्याची भूमिका मांडणारे ब्रिटीश राजकारणी जेरेमी कॉर्बिन यांची राहुल गांधी यांनी घेतली भेट !

(उजवीकडे) राहुल गांधी, (मध्यभागी) जेरेमी कॉर्बिन

लंडन (इंग्लंड) – ब्रिटन येथील ‘लेबर पार्टी’चे माजी खासदार आणि कट्टर भारत अन् हिंदु द्वेष्टे जेरेमी कॉर्बिन यांची काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली. यामुळे गांधी यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी गांधी यांच्या भेटीचा निषेध करत ‘काश्मीरला भारतापासून विलग करण्याची भूमिका उघडपणे मांडणाऱ्या कॉर्बिन यांना राहुल गांधी का भेटले ?’, असा प्रश्न उपस्थित करणारे ट्वीट केले आहे.

‘लेबर पार्टी’ने नेहमीच कॉर्बिन यांच्या काश्मीरसंदर्भातील भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. भाजपचे नेते आणि वैज्ञानिक विजय चौथाईवाले यांनीही गांधी यांच्या भेटीचा निषेध केला आहे.

संपादकीय भूमिका

राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षावर याआधीही पाकिस्तानची भूमिका पुढे रेटण्याचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे असे नेते अन् त्यांचे पक्ष यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी भारतीय जनता आतूर आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !