कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे

नागपूर – राज्यात आतापर्यंत कोरोनाचे नवीन २५४ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या आजारात बरे झालेले रुग्ण ९८ टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २३ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

ते म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांत वाढ झालेली नाही. लसीकरण चांगले झाले आहे. सध्या सक्रीय रुग्ण १ सहस्र ९५० आहेत. सध्या सर्वत्र गर्दी होत आहे. राजकीय मेळावे होत आहेत. तरीही कोरोनाचे रुग्ण अपेक्षित वाढत नाहीत. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. चौथ्या लाटेची सुतराम शक्यता वाटत नाही; मात्र असे असले, तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.