आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
(भाग १२)
१. रात्री झोपण्यापूर्वी अन्नपूर्णाकक्षातील साहित्य व्यवस्थित आवरून ठेवावे !
‘रात्री महाप्रसाद घेतल्यानंतर (जेवल्यानंतर) सर्व भांडी स्वच्छ करून अन्नपूर्णा कक्षातील साहित्य व्यवस्थित आवरून झोपावे. ही गोष्ट मी माझ्या आईकडून शिकले. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्व सेवा करायला सोपे जाते. पसारा नसल्याने किडे, किटाणू आणि उंदीर हेही रात्री तेथे फिरकत नाहीत. रात्रीच्या वेळी खरकटी भांडी तशीच ठेवल्यास अनिष्ट शक्ती ते खरकटे अन्न ग्रहण करतात. त्यातून अन्नपूर्णाकक्ष आणि ती भांडी दोन्हीही दूषित होतात.
२. अन्नपूर्णाकक्षात वावरतांना अधिकाधिक भाव ठेवण्याचे महत्त्व !
अन्नपूर्णाकक्षात वावरतांना तुम्ही जेवढा अधिक भाव ठेवाल, तेवढा तुम्हालाच अधिक लाभ होईल, हे लक्षात ठेवून या आचारधर्माचे पालन करावे. हे करणे प्रारंभी तुम्हाला कदाचित् थोडे कठीण वाटेल; परंतु तसे जरूर करून तर पहा. सकाळी तुमच्या अन्नपूर्णाकक्षातील स्पंदनांमध्ये तुम्हालाच लक्षणीय पालट दिसून येईल.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (१०.२.२०२२)