सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा ‘कौशल्य विकास योजना पुरस्कार’ घोषित !

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर, २३ मे (वार्ता.) – कौशल्य विकासाच्या संदर्भात उल्लेखनीय काम केल्याने सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा ‘कौशल्य विकास योजना पुरस्कार’ जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. पुरस्काराचे वितरण केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ९ जून २०२२ या दिवशी देहली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर, जनपथ येथे होणार आहे. सोलापूरच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने कोरोना संसर्गाच्या काळात बेरोजगारांचा ‘ऑनलाईन’ रोजगार मेळावा घेऊन सहस्रो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. सोलापूर जिल्ह्याला कौशल्य विकास योजनांमध्ये उत्कृष्ट काम केल्याविषयी ‘कौतुक पत्र’ मिळणार आहे. या पुरस्कारासाठी सोलापूरसमवेत सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम, ठाणे या जिल्ह्यांचाही समावेश आहे.