ट्विटरवर ‘Paratpar Guru’ हा ट्रेंड दिवसभर उच्चस्थानी !
फोंडा (गोवा) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २२ मे या दिवशी सकाळपासून #HinduEktaDindi या हॅशटॅगने आणि ‘Paratpar Guru’ अन् ‘परात्पर गुरु’ या ‘की-वर्ड्स’ने ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला. सकाळी चालू झालेला हा ट्रेंड थोड्याच वेळात राष्ट्रीय स्तरावर पहिल्या १० क्रमांकांत होता. #HinduEktaDindi हा ४ थ्या क्रमांकावर, तर ‘Paratpar Guru’ हा की-वर्ड ७ व्या क्रमांकावर ट्रेंड करत होते. विशेष म्हणजे, ‘Paratpar Guru’ हा की-वर्ड दिवसभर राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला. दुपारी १२.३० वाजता १४ व्या क्रमांकावर, दुपारी २.३० वाजता २१ व्या क्रमांकावर, दुपारी ४.४५ वाजता २१ व्या क्रमांकावर, तर सायंकाळी ५.४५ वाजताही २५ व्या क्रमांकावर हा ट्रेंड करत होता.
#HinduEktaDindi या हॅशटॅगने २७ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या, तर ‘Paratpar Guru’ या नावाने २० सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.
Founder of @SanatanSanstha &
@spiritual_uniInspiration of @HinduJagrutiOrg
MokshaGuru of millions of seekers
Creator of GuruKrupaYog
Savior of society
Millions of gratitude at the feet of #ParatparGuru Dr. Athavale on his 80th birth anniversary!!#HinduEktaDindi @Gp_hjs pic.twitter.com/Fb0CFcKuj6
— Sunil Ghanwat (@SG_HJS) May 22, 2022
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कीर्ती दिगंत होत असल्याचेच हे लक्षण !
एखादा विषय ट्रेंड करू लागला, तर सर्वसाधारणपणे तो २-३ घंटेच पहिल्या ३० क्रमांकांमध्ये असतो. यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाने झालेल्या ट्रेंडचे महत्त्व लक्षात येते. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याचे दैवी ध्येय उरी बाळगणारे आणि ज्यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय स्तरावर अद्वितीय धर्म अन् राष्ट्र उत्थानाचे कार्य गेल्या ३ दशकांहूनही अधिक काळ अव्याहत चालू आहे, अशा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कीर्ती दिगंत होत असल्याचेच हे लक्षण होय !