हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’त ५० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये मागील १ मासापासून ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरात पुजारी, संत आणि मान्यवर यांच्या वतीने १ सहस्र ११९ मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले, तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांत २३ ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. यासमवेतच ३२४ हून अधिक प्राचीन मंदिरे आणि ग्राम देवतांची मंदिरे यांठिकाणी ‘मंदिरांची स्वच्छता अभियान’ही राबवण्यात आले. या अभियानात ग्रामस्थ, समाजातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या अभियानात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्था, विभिन्न धर्मसंप्रदाय यांनी एकत्र येऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदूसंघटनाच्या विचाराला मुखर (बळकट) बनवले. ५० सहस्रांहून अधिक हिंदूंनी या अभियानाच्या अंतर्गत हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभाग घेतला. या सर्वांच्या प्रति मी आभार व्यक्त करतो आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच हे कार्य होऊ शकले, त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता अर्पण करतो, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रक काढून म्हटले आहे.