‘साधकांची अध्यात्मात उन्नती व्हावी’, या तळमळीने त्यांची क्षणोक्षणी काळजी घेणारे कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले !
एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात बसण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. प्रत्येक साधकाकडे बारकाईने लक्ष असणे
अ. सत्संगात एक साधिका दुसऱ्या साधिकेचा परिचय करून देत होती. तेव्हा एका साधकाने तिच्या हातातील वही घेतली. ती साधिका पुन्हा जागेवर येऊन बसली; पण ती वही त्या साधकाकडेच राहिली. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधकाला ‘साधिकेला तिची वही दे’, असे सांगितले.
आ. सत्संग चालू असतांना एक साधिका बाहेर जाऊन आल्या. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या बाजूला पाहिलेही नव्हते. काही वेळाने त्यांनी त्या साधिकेला विचारले, ‘‘तुम्ही परत आलात ?’’ तेव्हा ‘त्यांचे केवळ स्थुलातूनच नाही, तर सूक्ष्मातूनही ते आमच्यावर लक्ष ठेवत असतात’, हे माझ्या लक्षात आले.
२. ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, याची तळमळ
परात्पर गुरु डॉक्टर सत्संग संपल्यानंतर साधकांना ‘शिकायला मिळते ना ? सत्संगाचा लाभ होत आहे ना ?’, असे प्रेमाने विचारतात. तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेवांना साधकांची किती काळजी आणि प्रेम आहे ! ‘साधकांनी शिकावे. अध्यात्मात उन्नती करावी’, अशी त्यांना किती तळमळ आहे !
– आधुनिक वैद्या (सौ.) लिंदा बोरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.९.२०२१)
परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !अ. आपण कुटुंबात देवाण-घेवाण हिशोब फेडण्यासाठी एकत्र येतो; म्हणून घरात वाद-विवाद होतात. साधक हेच आपले खरे कुटुंब आहे. आ. साधना करून आपली आध्यात्मिक उन्नती झाल्यावर आपल्याला २४ घंटे सुरक्षित वाटू लागते. अध्यात्मात उन्नती झाल्यावर आपल्याला एकटेपणा किंवा असुरक्षितता वाटणार नाही. इ. आपण परिस्थिती स्वीकारू लागल्यास ‘आपला अहं न्यून झाला आहे’, असे समजावे. ई. आपल्याकडून चुका होत असल्यास ‘आपण देवापासून दूर जात आहोत’, असे समजावे. उ. आपल्या मनात पुष्कळ विचार येत असल्यास प्रत्येक विचार लिहून त्यावर स्वयंसूचना लिहिली, तर विचार येणे बंद होतील. – आधुनिक वैद्या (सौ.) लिंदा बोरकर (२४.९.२०२१) |
|