महर्षींनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्याविषयी केलेली भविष्यवाणी !
‘महर्षि म्हणतात, ‘साधकांच्या मनात ‘हिंदु राष्ट्र’ कधी येईल ?’, असा प्रश्न येतो. बाळाचा जन्म ७ व्या मासातही होऊ शकतो किंवा ९ व्या मासातही होऊ शकतो. ७ व्या मासात जन्माला आलेल्या बाळात बऱ्याच वेळा काहीतरी न्यूनता (दोष) आढळते. ९ व्या मासात जन्माला आलेले बाळ सुदृढ असते. ‘हिंदु राष्ट्र’ हेही एक बाळ आहे. ‘आपल्याला ७ व्या मासात जन्मलेले बाळ हवे कि ९ व्या मासात जन्मलेले बाळ हवे ?’, हे तुम्ही ठरवावे. चांगले आणि सुदृढ बाळ म्हणजे स्थिर ‘हिंदु राष्ट्र’ हवे असल्यास आपल्याला अजून थोडा वेळ थांबावे लागेल.
पर्वतावर पुष्कळ वेगात चढलो, तर खाली उतरतांना त्रास होतो आणि हळूहळू चढलो, तर खाली उतरतांना अल्प त्रास होतो.’
(‘महर्षींनी हिंदु राष्ट्राची तुलना नवजात बाळाशी केली आहे. महर्षींनी हिंदु राष्ट्राविषयी सुंदर उपमा दिली आहे आणि ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे’, याविषयी साधकांना आश्वस्त केले आहे.’ – संकलक)
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९७ (७.३.२०२२))