राष्ट्रध्वजावर उभे राहून नमाजपठण करणारा अझीझ पोलिसांच्या कह्यात !
नवी देहली – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबई येथून आलेल्या महंमद तारिक अझीझ नावाच्या व्यक्तीने भारतीय राष्ट्रध्वज भूमीवर अंथरून त्यावर उभे राहून नमाजपठण केल्याने त्याला कह्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना ८ मे या दिवशीची असून ती आता समोर आली आहे. अझीझ मूळचा आसामचा आहे.
विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना अजीजचे वर्तन संदिग्ध वाटल्याने त्यांनी त्याला कह्यात घेऊन देहली पोलिसांकडे सुपुर्द केले. अझीझ प्रश्नांची योग्य पद्धतीने उत्तरे देऊ शकत नव्हता. यानंतर पोलिसांनी अझीझवर ‘राष्ट्रीय सन्मान अपमानावर आळा घालणे अधिनियम, १९७१’च्या अंतर्गत गुन्हा नोंद केला.
संपादकीय भूमिकाराष्ट्रध्वजाचा अवमान कोण करतात, हे लक्षात घ्या ! |