परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मनमोहक हास्याविषयी साधकांचे हृद्य मनोगत !
याचसाठी केला होता हा अट्टहास….!
‘११.१२.२०१९ या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळा’होता. साधक सेवा पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करायचे, तेव्हा परात्पर गुरुदेव कृपाकटाक्ष टाकून साधकांकडे पाहून मनमोहक हसायचे. त्यांचे ते हास्य पाहून वाटायचे, ‘गुरुदेवा, याचसाठीकेला होता हा अट्टहास….!’ – सौ. मधुवंती चारुदत्त पिंगळे (१३.१२.२०१९)
साधकांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे मधुर स्मितहास्य !
‘प.पू. डॉक्टरांकडून आम्हाला नेहमी खाऊ, कौतुकाचे बोल किंवा त्यांचे गोड हास्य या माध्यमांतून ‘प्रसाद’ मिळत असे. ते आम्हाला पाहून करत असलेले मधुर स्मित किंवा त्यांचा एक कृपाकटाक्षही साधनेसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करत असे. त्यांनी केलेल्या कौतुकामुळे किंवा त्यांच्या गोड हास्याने मला नेहमीच शक्ती आणि चैतन्य मिळाल्याचे जाणवत असे.’- डॉ. रश्मी नल्लादारू, आशिया पॅसिफिक (३.५.२०१६)
ईश्वराप्रती ओढ निर्माण करणारे गोड हास्य !
परात्पर गुरु डॉ. आठवले अभ्यासवर्गात स्वतःविषयी काहीही सांगत नसत. असे असले, तरी ‘ते एकथोर संत आहेत’, असे मला नेहमी वाटत असे. त्यामुळे ‘कधी एकदा त्यांना भेटीन आणि त्यांना नमस्कार करीन’, असे मला होत असे. मी त्यांच्या चरणांवर डोके ठेवून उठले की, ते माझ्याकडे पाहून गोड हसायचे. ईश्वराप्रतीची ओढ त्यांच्या गोड हास्याने माझ्यामध्ये निर्माण केली होती’,असे माझ्या लक्षात येते.’ – सौ. विजयालक्ष्मी आमाती, गोवा. (६.३.२०१७)
परात्पर गुरुदेव हसतात, तेव्हा संपूर्ण सृष्टी आनंदी होते !
‘श्रीरामाच्या समवेत असलेले सर्व जण हसतमुख आणि आनंदी असत. श्रीकृष्ण हसतांनाही त्याचे सर्वसखे-सोबती, निसर्ग, पशू-पक्षी आनंदी व्हायचे. त्याचप्रमाणे ‘परात्पर गुरुदेव हसतात, तेव्हासंपूर्ण सृष्टी आनंदी होते’, हे मला अनुभवायला मिळाले.’- श्री. नीलेश गोरे, बार्शी (जिल्हा सोलापूर)
चिरंतन आनंद देणारे हसरे मुखमंडल !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पहातांना मनात भक्तीभाव निर्माण होतो. त्यांचा सहवास आबालवृद्धांना हवाहवासा वाटतो. त्यांचा हसरा तोंडवळा मनाला चिरंतन आनंद देतो. ‘त्यांच्यादर्शनाने अलभ्य लाभ होत आहे’, असे वाटते. त्यांचे अनेक वेळा दर्शन झाले, तरी प्रत्येक दर्शन हे नाविन्यपूर्ण असते.’ – डॉ. अजय गणपतराव जोशी, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (१७.५.२०१७)
जन्मोजन्मींचा थकवा, ताणतणाव नष्ट करणारे गोड हास्य !
‘काही वर्षांपूर्वी रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्ही बसलेल्या खोलीत प्रवेश केला, तेव्हा सर्वांवर अलौकिक तेज पसरत असल्याचे जाणवले. परात्पर गुरु डॉक्टरांचे गोडहास्य पाहून जन्मोजन्मींचा थकवा आणि ताणतणाव सर्व नष्ट होऊन अंतःकरण सद्गतीत झाले. त्यांचीती कृपाळू दृष्टी पाहून माझे मन आनंदाने फुलून गेले.’ – सौ. रंजना अशोक वाघमारे, भाळवणी, जिल्हा सोलापूर. (१२.११.२०१९)
परात्पर गुरुदेवांची प्रत्येक गोष्ट साधकांसाठी अनमोल असणे !‘प.पू. गुरुदेव, तुमचे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांना तोड नाही. जेव्हा तुम्ही आमच्या प्रश्नांचीउत्तरे देता, तेव्हा आमच्या मनातील सर्व प्रश्न जणू विरघळून जातात. ज्ञानार्जनाचे ते क्षणशब्दातीत असतात. प.पू. गुरुदेव, तुमची कांती तेजस्वितेचे प्रकटीकरण आहे. ‘तुमचे मधुर हास्य पुनःपुन्हा आठवणे’, हेप्रत्येक साधकाचे वेड आहे. आम्हा साधकांसाठी तुमचे चातुर्य आणि तेज आध्यात्मिक वाटचाल चालूठेवण्याचे प्रेरणास्रोत आहेत. तुमच्या मुखकमलाचे दर्शन हा आमच्यासाठी प्राणवायू आहे ! प.पू. गुरुदेव, ‘तुम्ही एखाद्या वस्तूला स्पर्श करणे किंवा त्या वस्तूकडे पहाणे’, हा त्या वस्तूचाभाग्योदय असतो. वस्तूंना स्वतःचे असे वैशिष्ट्य नसते; परंतु तुमची दैवी दृष्टी पडल्यावर त्या वस्तू चैतन्याने झळाळू लागतात. तुम्ही प्रत्येक निर्जीव वस्तू, तसेच प्रत्येक लहान-मोठा जीव यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवता, तसेच त्यांना प्रीतीने न्हाऊ घालता. स्वाभाविकपणे त्या वस्तूच्या अस्तित्वाला अथवा त्या जिवाच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. तुमची प्रीती आमच्यासाठी संजीवनी आहे !’ – सौ. श्वेता क्लार्क, सनातन आश्रम, रामनाथी. (१७.५.२०१७) |