अभिनेत्री केतकी चितळे यांना ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ४ दिवसांची पोलीस कोठडी !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळे यांना ठाणे सत्र न्यायालयाने ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तींविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात त्यांच्यावर वर्ष २०२० मध्येही ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केतकी यांना ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात त्यांना अटक केली