दुचाकी चालवतांना ‘हेल्मेट’ घातल्यावरही होऊ शकतो दंड !
नवी देहली – नव्या वाहतूक नियमानुसार आता हेल्मेट (शिरस्त्राण) घातले असतांनाही २ सहस्र रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. चालकाने दुचाकी चालवतांना हेल्मेटची ‘स्ट्रिप’ लावली नसेल, तर नियम ‘१९४ डी.एम्.व्ही.ए.’नुसार १ सहस्र रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. तसेच सदोष ‘हेल्मेट’ (बी.आय.एस्. नसलेले) घातले असेल, तरी नियम ‘१९४ डी.एम्.व्ही.ए.’नुसार १ सहस्र रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
सावधान: अब बाइक पर हेलमेट पहनने के बावजूद कटेगा 2000 रुपये का चालान, अगर… #TrafficRule #TrafficAlert https://t.co/8HttNwo9Rh
— लोकमत हिन्दी (@LokmatNewsHindi) May 19, 2022
या जोडीलाच वाहन ‘ओव्हरलोडेड’, म्हणजे अतिरिक्त भार वाहून नेत असेल, तर चालकाला २० सहस्र रुपये एवढा दंडही होऊ शकतो. यासह चालकाला प्रति टन २ सहस्र रुपयांचा अतिरिक्त दंडही भरावा लागू शकतो.