गोमांसाचा पदार्थ आणून शिक्षकांना देण्याचा प्रयत्न करणार्या मुख्याध्यापिकेला अटक
गौहत्ती (आसाम) – आसामच्या लखीपूर येथील हर्काचुंगी मिडल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दालिमा नेसा यांनी शाळेत जेवणाच्या डब्यात गोमांसाचा पदार्थ आणून तो अन्य शिक्षकांना देऊ केल्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
In #Assam, a govt school headmistress has been booked for carrying beef in lunchhttps://t.co/WOEkLZeZcg
— Zee News English (@ZeeNewsEnglish) May 19, 2022
नेसा यांनी अन्य शिक्षकांना गोमांस देण्याचा प्रयत्न केल्यावर काही शिक्षकांनी याची तक्रार राज्य शिक्षण विभागाच्या पदाधिकार्यांचा दौरा चालू होता. त्यांनी शाळेला भेट दिली असतांना शिक्षकांनी मुख्याधापिकेची त्यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर नेसा यांना अटक करण्यात आली. वास्तविक आसाममध्ये गोमांस खरेदी विक्री आणि सेवन यांवर बंदी नाही; पण हिंदु, जैन, शीख आणि अन्य गोमांस निषिद्ध असलेल्या समुदायांच्या रहिवासी क्षेत्रापासून, तसेच कोणत्याही मंदिरापासून ५ कि.मी. अंतराच्या आत विक्रीला मनाई करण्यात आली आहे.