आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग ९)

पू. तनुजा ठाकूर

३. ५० वर्षांपूर्वी वापरण्यात येणाऱ्या पितळ, कांस्य, माती किंवा तांबे यांच्या भांड्यांची जागा आता स्टील, तसेच चिनी मातीची भांडी (बोन चायना) यांनी घेतलेली असणे अन् यातूनच भारतियांना रोग जडणे

५० वर्षांपूवी सर्व हिंदू पितळ, कांस्य किंवा तांबे अशा सात्त्विक धातूंनी बनवलेल्या भांड्यांत स्वयंपाक करायचे आणि त्यात अन्नही ग्रहण करायचे. मातीच्या भांड्यांचाही उपयोग पोळी बनवणे, तव्याच्या रूपात किंवा डाळ-तांदूळ शिजवणे, दूध तापवणे, दही लावणे, लोणचे ठेवणे यांसाठी केला जात असे. मातीच्या बोळक्यातील (लहान मडके) चहा तर आजही अनेक ठिकाणी प्रचलित आहे; परंतु जेव्हापासून आपण आधुनिक झालो, सर्वांत प्रथम आपण आपल्या सात्त्विक जीवनपद्धतीचाच परित्याग केला. आपण स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करू लागलो. अधिक पैसा आल्यावर चिनी मातीच्या भांड्यांचा (बोन चायना) वापर चालू केला. आपली बुद्धी इतकी भ्रष्ट झाली आहे की, देवतेचे चैतन्य ग्रहण करणाऱ्या तांबे, कांस्य आणि पितळ या भांड्यांचा त्याग करून आपण आसुरी स्वरूपाच्या भांड्यांमध्ये नैवेद्य नाही, तर स्वयंपाक करत आहोत. आपण म्हणतो, ‘भारतीय रोगी बनत आहेत.’ आता तुम्हीच सांगा, अशा स्थितीत भारतीय रोगी नाही, तर निरोगी होतील का ?

(क्रमश:)

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)