पुणे महापालिकेने दुकानांवर मराठी नामफलक नसलेल्यांवर कारवाई करावी !
‘मराठी एकीकरण समिती’ची मागणी
पुणे – शहरातील दुकाने आणि आस्थापने यांना त्यांचे नामफलक मराठी भाषेमध्ये ठळक मोठ्या अक्षरांत असणे बंधनकारक आहे; परंतु अनेक ठिकाणी इंग्रजी भाषेतील फलक दिसून येतात. त्यामुळे केवळ कायदा करून प्रश्न सुटत नाहीत. त्याची कार्यवाही प्रभावीपणे केली पाहिजे. त्यामुळे महापालिकेच्या आस्थापना कार्यालयाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘मराठी एकीकरण समिती’चे शहर प्रतिनिधी तुषार गोडसे यांनी महापालिकेकडे केली आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? कायद्याची कार्यवाही करणारे प्रशासन हवे ! |