मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन संमत !
मुंबई – मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन संमत केला आहे. १९ मे या दिवशी हा निर्णय न्यायालयाने घोषित केला. १७ मे या दिवशी सुनावणी झाली होती; मात्र त्यावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. ४ मे या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणी असतांना पोलिसांनी देशपांडे आणि संतोष धुरी यांना कह्यात घेण्याचा प्रयत्न केला असता ते निघून गेले. तेव्हा पासून हे दोघेही भूमीगत होते. न्यायालयाकडून मिळालेल्या जामिनामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.