इस्रो आणि अंतराळ विभाग यांच्याकडून गेल्या २ वर्षांत ५५ हून अधिक ‘स्टार्टअप’ची नोंदणी !

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (बैठकीत मध्यभागी)

नवी देहली – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी विज्ञान मंत्रालयाच्या सर्व विभागांची बैठक आयोजित केली होती. त्या वेळी ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ आणि अंतराळ विभाग यांना गेल्या २ वर्षांत अंतराळ संशोधनाशी संबंधित ५५ हून अधिक ‘स्टार्टअप्स’चे (नव्या उद्योगांचे) अर्ज आले होते. त्या सर्वांची नोंदणी करण्यात आली आहे.

इस्रोला खासगी लोकांसाठी मोकळीक दिल्यानंतर ही नोंदणी झाली आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहांना अंतराळात पाठवण्याची संधी देण्याची योजना आहे’, अशी माहिती डॉ. सिंह यांनी दिली.