चीनकडून लडाखच्या पँगाँग तलावावर दुसर्या पुलाचे बांधकाम
लडाख – चीन लडाखच्या पूर्व भागातील सीमेवर असणार्या पँगाँग त्सो तलावावर आणखी एक पूल बांधत असल्याचे समोर आले आहे. उपग्रहाद्वारे काढण्यात आलेल्या छायाचित्रातून ही गोष्ट समोर आली आहे. या पुलाचा वापर करून चीन त्याच्या सैन्याला अल्पावधीत सीमेजवळ एकत्रीत आणू शकतो. चीनने यापूर्वीच येथे एक पूल बांधला आहे. या पुलाच्या बांधकामावर भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा टिप्पणी करण्यात आलेली नाही. संशोधक डेमियन सायमन हे प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चिनी हालचालींवर लक्ष ठेवतात. त्यांनी ट्वीट करून चीनच्या नवीन पुलाच्या बांधकामाचे उपग्रहाद्वारे काढण्यात आलेले छायाचित्र पोस्ट केले आहे. २ वर्षांपूर्वी याच भागात चीन आणि भारतीय सैन्यात संघर्ष झाला होता.
China is constructing a second bridge in an area held by it around the strategically key Pangong Tso lake in Ladakh & it could help the Chinese military quickly mobilise in the region, according to satellite imagery & people familiar with the development
https://t.co/qZgFEHEafY— Economic Times (@EconomicTimes) May 18, 2022
संपादकीय भूमिकाचीनच्या कुरापती थांबवण्यासाठी भारताने आक्रमक पावले उचलणे आवश्यक ! |