आर्थर रोड कारागृहातील बंदीवान महिलेवर धर्मांध आरोपीकडून लैंगिक अत्याचार !
मुंबई – येथील आर्थर रोड कारागृहात १९ वर्षीय बंदीवान महिलेवर महंमद इरशाद इस्लाम शेख या धर्मांधाने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी त्याच्या विरोधात एन्.एम्. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १५ एप्रिलच्या रात्री २ नंतर ही घटना घडली. कारागृहातील बंदीवान महिलांचे लैंगिक शोषणाच्या या गंभीर गुन्ह्याप्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी चालू आहे.
संपादकीय भुमीकाकारागृहात लैंगिक अत्याचार करणे म्हणजे वासनांधतेने गाठलेली परिसीमाच ! |