राज्यात मुदतपूर्व स्थानांतरामुळे पोलीस अधिकारी अप्रसन्न !
न्यायाधिकरणाकडे दाद मागणार !
जळगाव – राज्याच्या गृह विभागातील १७१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मुदतपूर्व स्थानांतर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या स्थानांतरासाठी त्यांची इच्छाही विचारात घेतली जाणार आहे; मात्र महत्त्वाच्या जागी नियुक्त असलेले काही पोलीस अधिकारी या मुदतपूर्व स्थानांतरांमुळे अप्रसन्न झाले असून ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाद मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानांतर होत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये ३९ साहाय्यक पोलीस आयुक्त, १४ पोलीस अधीक्षक आणि ९३ पोलीस उपअधीक्षक यांचा समावेश आहे.