केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !
गोरेगाव पोलिसांनी घेतला केतकीचा ताबा
ठाणे, १८ मे (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ठाणे सत्र न्यायालयात केतकी हिच्या सुनावणीच्या वेळी गोरेगाव पोलीसही तिचा ताबा घेण्यासाठी पोचले. गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली आहे. न्यायालयाकडून तिला कोठडी देण्यात आली असून गोरेगाव पोलिसांनी तिचा ताबा घेतला आहे. तिचा भ्रमणभाष संच आणि भ्रमणसंगणक सायबर शाखेकडे अन्वेषणासाठी देण्यात आला असून त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. तो आल्यानंतर पुढील अन्वेषण करण्यात येईल.