लाच घेतांना प्रदूषण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक !
बेळगाव, १८ मे (वार्ता.) – एका उद्योजकाकडून ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ चिकोडीचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार शंडुरी आणि विभागीय साहाय्यक अधिकारी प्रदीप ममदापूर या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या प्रकरणी इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील उद्योजकांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.