अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मराठा महासंघ आणि शिवप्रेमी यांची मागणी
औरंगजेबच्या कबरीवर नतमस्तक झाल्याचे प्रकरण
कुडाळ – एम्.आय.एम्. पक्षाचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी संभाजीनगर येथे जाऊन तेथील औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. ओवैसी यांच्या या कृतीमुळे सर्व शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी (संभाजी महाराज) यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे ओवैसींवर कारवाई करावी, अशी मागणी मराठा महासंघ आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना यांनी पोलीस निरीक्षक फूलचंद मेंगडे यांच्याकडे केली आहे.
ओवैसी यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार नोंद करणार ! – अधिवक्ता सुहास सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक, मराठा महासंघ
कुडाळ – अकबरुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या औरंगाजेबच्या कबरीवर फुले वाहून त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या कृतीचा सिंधुदुर्ग जिल्हा मराठा महासंघ निषेध करत आहे. ओवैसी यांच्या विरोधात राज्यात पोलीस ठाण्यात तक्रारी देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मराठा महासंघ १९ मेनंतर ओवैसी यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार नोंद करणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हा संयोजक तथा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अधिवक्ता सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मराठा युवा मोर्चाचे बंड्या सावंत उपस्थित होते.