(म्हणे) ‘औरंगाबादच्या नामांतराचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही; आमच्यासाठी पाणीप्रश्न महत्त्वाचा !’ – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
संभाजीनगर – औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. प्रत्येक पक्षाचे अजेंडे असतात. त्यावर माझे व्यक्तिगत मत देणे योग्य नाही; मात्र सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही. आमच्या पक्षाच्या अजेंड्यावर तर मुळीच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या लोकांना संभाजीनगर म्हणण्यात आनंद वाटतो. काही लोक त्यांची आवश्यकता आणि सोयीप्रमाणे संभाजीनगर म्हणतात; मात्र मला वाटत नाही की, हा विषय लगेच अजेंड्यावर घ्यावा. आपल्यासमोर शहरातील पाणी, रस्ता, वीज आणि अन्य प्रश्नही महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न तडीस लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १७ मे या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिले.