लखनौ शहराचे नाव पालटण्याचे योगी आदित्यनाथ यांचे सुतोवाच !
लखनौ आणि लक्ष्मण यांचा संबंध !
♦ रामनगरी अयोध्या लखनौपासून ८० किलोमीटर दूर आहे.
♦ भगवान लक्ष्मण यांनी लखनौ शहर वसवले होते.
♦ लखनौ खासदार आणि माजी मंत्री लालजी टंडन यांनी त्यांच्या पुस्तकात लखनौचा उल्लेख ‘लक्ष्मण नगरी’ असा केला होता.
♦ लखनौमध्ये ‘लक्ष्मण टीला’, ‘लक्ष्मण पार्क’, ‘लक्ष्मण पुरी’ अशी अनेक ठिकाणे आहेत, जी भगवान लक्ष्मण यांच्या नावाने आहेत.
♦ लखनौ शहराचे नाव पालटून ‘लखनपुरी’, ‘लक्ष्मणपुरी’ किंवा ‘लखनपूर’ करावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे.
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – प्रयाग (अलाहाबाद) आणि अयोध्या (फैजाबाद जिल्हा) यांच्यानंतर आता राज्याची राजधानी असलेल्या लखनौ शहराचे नाव पालटणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका ट्वीटद्वारे केले असल्याचे म्हटले जात आहे.
शेषावतार भगवान श्री लक्ष्मण जी की पावन नगरी लखनऊ में आपका हार्दिक स्वागत व अभिनंदन… pic.twitter.com/zpEmxzS3OE
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 16, 2022
योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘‘शेषावतार भगवान लक्ष्मणाच्या पावन नगरीत आपले हार्दिक स्वागत आणि अभिनंदन !’’ ट्वीटसमवेत पंतप्रधान मोदी यांच्या विमानतळावरील भेटीचे छायाचित्रही त्यांनी जोडले आहे.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकारने मुसलमान आक्रमणकारी आणि ब्रिटीश यांनी विविध शहरांना दिलेली सर्व नावे पालटून क्रूरकर्म्यांच्या मानसिक गुलामगिरीपासून देशाला मुक्त करावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते ! |