कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे असून त्याला राजकीय पाठिंबा ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष)
तमिळनाडू राज्यातील ‘लावण्या’ नावाची एका शेतकऱ्याची हुशार मुलगी ख्रिस्ती संचालित शाळेत दहावीत शिकत होती. तिच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याने तिने आत्महत्या केली. ख्रिस्त्यांकडून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत धर्मांतर करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो. कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदु संस्कृती पाळण्यास विरोध केला जात असून सर्व ख्रिस्ती संचालित शाळा धर्मांतराची केंद्रे बनत आहेत. याला राजकीय पाठिंबाही मिळत आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.