परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी आलेली अनुभूती
समष्टी साधना होत नसल्याने खंत वाटणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी अचानक एक मैत्रीण घरी आल्यावर तिला नामजप सांगितला जाणे आणि त्या माध्यमातून गुरुदेवांनी समष्टी सेवेचा आरंभ करून दिला असल्याचे जाणवणे : १३.५.२०२० या दिवशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित भावसत्संग ऐकत होते. त्या वेळी ‘मी पुष्कळ स्वार्थी आहे. मी काहीही समष्टी साधना करत नाही. गुरुदेवांच्या कार्याचा प्रसार माझ्याकडून होत नाही’, असे माझ्या मनात विचार येत होते. अचानक भावसत्संगाच्या शेवटचा भाग पहात असतांना माझी एक मैत्रीण माझ्या घरी आली आणि ती भावसत्संग पाहू लागली. त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवांनीच माझ्या मैत्रिणीला साधना सांगण्यासाठी माझ्या घरी पाठवले आहे’, असे मला वाटले. मी तिला प्रथम ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप करण्यास सांगितला. नंतर मी तिला‘ श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ नम: शिवाय ।’ हे २ नामजप करण्यास सांगितले. त्या दिवशी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या समष्टी साधनेला आरंभ करून दिला आहे’, याची मला जाणीव झाली. त्यामुळे माझा गुरूंप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला.
– सौ. स्वप्नजा तळेगावकर, देहली (जून २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |