स्वत:चे वडील आणि भाऊ यांना ठार मारणाऱ्या औरंगजेबाचे उदात्तीकरण का ? – अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे – भाग्यनगरचा एक नेता औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन अभिवादन करतो. ज्याने स्वत:च्या वडिलांना आणि भावाला ठार मारले, असंख्य नागरिकांना कंठस्नान घातले अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण का ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. एम्.आय.एम्.चे नेते अकबरूद्दीन ओवैसी यांनी संभाजीनगर दौऱ्यावर असतांना सभेआधी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. औरंगजेबाच्या कबरीवर त्यांनी चादरही चढवली. या वेळी त्यांच्यासह खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण, तसेच मोठ्या संख्येने मुसलमान उपस्थित होते.
अकबरूद्दीन ओवैसी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह संभाजीनगर येथील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना, तसेच औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी भेट दिली. त्यावरून अकबरूद्दीन ओवैसी यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
संपादकीय भूमिकाछत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ करून त्यांची हत्या करणाऱ्या, भारतातील सहस्रो हिंदु मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारणाऱ्या, भारतभरातील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा एकप्रकारे राष्ट्रद्रोहच आहे. अशा औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणे म्हणजे त्याच्या अमानुष कृतीचे समर्थन केल्यासारखेच आहे ! |