सोलापुरात हिंदुतेजाचा हुंकार !
रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा… विजयश्रीला श्रीविष्णुपरी भगवा झेंडा एकची हा…..!
सनातन संस्थेच्या ‘हिंदू एकता दिंडी’त ५ सहस्र ५०० हून अधिक जणांचा सहभाग !
सोलापूर, १६ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे कार्य आता तळागाळापर्यंत पोचत आहे. सनातन संस्था जी साधना सांगते, त्याच मार्गाद्वारे मानवी जीवन, समाज आणि अंतिमत: राष्ट्र निर्मितीच्या कार्यात मोलाचा वाटा उचलला जाणार आहे. हा विश्वास सार्थ ठरवत सोलापूर येथे १५ मे या दिवशी झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’साठी सहस्रोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला. या दिंडीमध्ये ५ सहस्र ५०० हिंदूंच्या सहभागाने सोलापुरात हिंदुतेजाचा अविष्कार पहायला मिळाला. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक संत सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, पू. (कु.) दीपाली मतकर आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार या संतांची वंदनीय उपस्थिती होती. धर्मध्वज आणि पालखी पूजनाचे पौरोहित्य श्री. शैलेंद्र जोशी आणि श्री. वैभव कामतकर यांनी केले. बाळीबेस येथून निघालेल्या दिंडीचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे करण्यात आला.
ही उपस्थिती म्हणजे विरोधकांच्या डोळ्यात हिंदुत्वाचे झणझणीत अंजन घालणारी ठरली ! आबालवृद्धांपासून प्रत्येक हिंदूंमधील दिंडीसाठी येण्याचा, दिंडीतील हिंदुरस अनुभवण्याचा उत्साह अपूर्व होता. त्यामुळे सोलापुरातील ही दिंडी ‘रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा, विजयश्रीला श्रीविष्णुपरी भगवा झेंडा एकची हा….!’ हे गीत सार्थ करणारी ठरली.
संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. वाघचवरे महाराज हे कामती (जिल्हा सोलापूर) येथून ४० विद्यार्थ्यांच्या मृदंग पथकासह दिंडीमध्ये सहभागी झाले होते. या पथकातील विद्यार्थ्यांनी पाऊलखेळ यांसह सादर केलेल्या विविध प्रकारांनी सोलापूरकरांची मने जिंकली.
अभूतपूर्व दिंडी आणि प्रसिद्धीमाध्यमांचा अभूतपूर्व प्रतिसाद !सोलापूर शहरात निघालेल्या अभूतपूर्व दिंडीस प्रसिद्धीमाध्यमांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. ‘सकाळ’, ‘सोलापूर तरुण भारत’, ‘संचार’, ‘पुण्यनगरी’, ‘दिव्य मराठी’, ‘सोलापूर भूषण’, ‘लोकमत’ या प्रमुख दैनिकांसह अनेक संकेतस्थळांनी दिंडीच्या पूर्वनियोजनासाठी आयोजित पत्रकार परिषद आणि दिंडीचे वृत्त यांना चांगली प्रसिद्धी दिली. अनेकांनी रंगीत छायाचित्रासह प्रमुख पृष्ठावर वृत्त प्रसिद्ध केले. यामुळे सहस्रो वाचकांपर्यंत वृत्त पोचले. ही प्रसिद्धीमाध्यमांनी सनातनच्या कार्याला दिलेली पोचपावतीच आहे. |
विशेष
१. श्री. प्रेमकुमार झाड यांनी धर्मध्वजासमवेत स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके करणाऱ्या युवा वर्गावरही पुष्पवृष्टी केली. त्यासाठी त्यांनी अधिकची फुलेली मागवली. या वेळी त्यांचे डोळे कृतज्ञताभावाने भरून आले होते. ते या वेळी म्हणाले, ‘‘ही लहान वयातील मुले धर्मकार्य करत आहेत, मी त्यांच्यावर फुले उधळून तरी कृतज्ञता व्यक्त करू शकतो.’’
२. श्री. संदीप (बंटी) बेळमकर यांनी हलगीच्या निनादात दिंडीचे स्वागत केले. स्वागताच्या वेळी त्यांनी धर्मध्वजाला डोके टेकवून नमस्कार केला आणि घोषणा दिल्या. या वेळी त्यांचा धर्माप्रती भाव जागृत झाला होता.
हिंदु राष्ट्र सनातन संस्थाच आणू शकते ! – बापू ढगे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र भावसार समाज
दिंडीच्या समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ‘महाराष्ट्र भावसार समाजा’चे उपाध्यक्ष श्री. बापू ढगे म्हणाले, ‘‘या देशात हिंदु राष्ट्र यावे, असे साधू-संत, नागरिक आणि काही राजकीय पक्ष यांना वाटते; मात्र त्यांच्यात एकवाक्यता आणि सुसूत्रता नाही, तसेच सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे साधनेचा अभाव आहे. छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले, तसेच प्रभु श्रीरामाचे रामराज्य होते, ते साधना-अध्यात्म यांच्या बळावरच ! सनातन संस्था साधना शिकवत असल्याने योग्य दिशादर्शन होते. त्यामुळे हिंदु राष्ट्र सनातन संस्थाच आणू शकते.’’ या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सनातन संस्थेच्या हिंतचिंतकांकडून दिंडीचे पुष्पवृष्टी करून आणि पुष्पहार घालून स्वागत !
चाटे गल्ली येथे गोरक्षक श्री. गोपाल सोमाणी यांनी कुटुंबियांसह, ‘ब्रह्मानंद गणपति समाज सेवा ट्रस्ट’चे श्री. संदीप (बंटी) बेळमकर आणि मित्रपरिवार, माणिक चौक येथे भाजपचे नगरसेवक अमर पुदाले आणि श्री. संतोष सिद्दे, ‘ई-स्क्वेअर टेलर’चे मालक श्री. अशोक चौधरी आणि मित्र परिवार, ‘सोलापूर कार्ड’चे श्री. गणेश वाडेकर आणि मित्र परिवार, श्री. मल्लिनाथ शिरसी, श्री. सुमितजी डागा, श्री. अनिल कोणशिरसगी,
श्री. प्रेमकुमार झाड बंधू, श्री देगावकर ज्वेलर्स आणि करजगीकर ज्वेलर्सचे श्री. गुरुनाथ करजगीकर, श्री. संदीप बेळमकर, तर उद्योजक वसाहतीतून सुभाष चौक येथे येऊन श्री. विजयकुमार निरोळे यांनी दिंडीतील धर्मध्वजाला पुष्पहार घालून, तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
दिंडीत सहभागी संघटना
क्षत्रिय समाजाचे एस्.एस्.के. युवती प्रतिष्ठान, संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था, योग वेदांत सेवा समिती, अखिल भाविक वारकरी मंडळ, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, हिंदु राष्ट्र सेना, बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ आदी संघटना उपस्थित होत्या.
उपस्थित मान्यवर
श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी श्री. राजशेखर हिरेहब्बू, माजी नगरसेवक जगदीश पाटील (आण्णा), भाजपच्या नगरसेविका सौ. राधिका दत्तात्रय पोसा, नगरसेविका सौ. संगीता जाधव, ह.भ.प. ईश्वर महाराज कुंभार, ह.भ.प. बळीराम महाराज जांभळे, ह.भ.प. वाघचवरे महाराज, ‘सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर’चे सदस्य बसवराज इटकळे, भाजपचे श्री. नागेश सरगम, ‘पद्मशाली ज्ञाती संस्थे’चे माजी सचिव श्री. सत्यनारायण गुर्रम, ‘श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती’चे श्री. यतिराज होनमाने, गोरक्षक श्री. सुधीर बहिरवडे, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. रवी गोणे, श्री. आनंद मुसळे, गीता परिवाराचे श्री. मनमोहनजी भुतडा, ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक’चे अध्यक्ष श्री. रंगनाथ बंकापुरे, ‘श्री यल्लम्मा देवी मंदिर ट्रस्ट’चे सदस्य श्री. मनोहर इगे, योग वेदांत सेवा समितीचे श्री. योगिराज हरसुरे, ‘केशव सांस्कृतिक मंडळा’चे श्री. बालाजी गणपा, ‘प्रेमप्रकाश आश्रमा’चे संस्थापक आचार्य सद्गुरु स्वामी टेऊँरामजी महाराज संप्रदायाचे साधक श्री. मुकेश कटारिया, श्री. विजय महिंद्रकर, गोरक्षक श्री. प्रशांत परदेशी, ‘स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थे’चे शहर संघटक श्री. शीतल परदेशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. घनश्याम दायमा आणि बांधकाम व्यावसायिक श्री. संकेत थोबडे
क्षणचित्रे
१. बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचालित विद्यानिकेतन हायस्कूल आणि हिंगुलांबिका प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी लेझीम, टाळ, ढोल या पथकांसह सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी विविध मर्दानी खेळ सादर केले, तसेच विविध राष्ट्रपुरुषांच्या व्यक्तीरेखाही साकारल्या होत्या.
२. अनेक उद्योजक आणि प्रतिष्ठित स्वतःहून दिंडीतील सेवांमध्ये सहभागी झाले होते, उदा. सरबताचे पेले गोळा करणे, दिंडीतील उपस्थितांना सरबत देणे.
३. चौकाचौकांमध्ये समाजातील हितचिंतकांकडून दिंडीवर फुलांचा वर्षाव केला जात होता. यापैकी एक हितचिंतक उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘तुम्ही एवढे मोठे धर्माचे कार्य करत आहात, एवढी मोठी दिंडी काढली आहे, यावर फुलांचा वर्षाव करणे एवढे तर आम्ही करू शकतो आणि हे आम्ही करायलाच हवे !’’
४. दिंडीमध्ये सहभागी झालेले धर्मप्रेमी उद्योजक उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘नियोजन पुष्कळ चांगले आहे. अशी दिंडी प्रत्येक गावागावात व्हायला हवी.’’
आज कुणीही उठतो आणि हिंदु देवतांचे विडंबन करतो, देवतांचे बाप काढतो ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
आज कुणीही उठतो आणि हिंदु देवतांचे विडंबन करतो, देवतांचे बाप काढतो, राष्ट्रपुरुषांचे विडंबन करतो, असे असेल तर हिंदूंना वाली कोण ? तर या विरोधात आपल्याला संघटिपणे कृती करून उत्तर द्यावे लागेल आणि हिंदु राष्ट्र हेच त्याला योग्य उत्तर आहे.’’
या प्रसंगी सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे म्हणाल्या, ‘‘पहाटे ५ वाजता आमचा धार्मिक अधिकार आहे म्हणून जे अजान देतात त्यांना ‘देव आहे का ?’, असे विचारण्याचे धाडस कुणी करत नाही. या सर्वांना आता त्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे !’’ |
सनातन संस्थेच्या वतीने शिस्तबद्ध हिंदू एकता दिंडी ! – दैनिक सकाळदैनिक ‘सकाळ’ने वार्तांकन करतांना ‘सनातन संस्थेच्या वतीने शिस्तबद्ध हिंदू एकता दिंडी !’, असा मथळा दिला असून प्रसिद्धीमाध्यमांनाही आता अन्य फेरी, दिंडी आणि सनातन संस्थेची दिंडी यांतील फरक प्रकर्षाने जाणवत आहे. |
शाळांमध्ये बायबल शिकवण्यास बंदी यावी, यासाठी १८ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समितीया प्रसंगी श्री. राजन बुणगे म्हणाले, ‘‘राज्यघटना धर्मनिरपेक्ष असतांना शाळा-महाविद्यालयांत आज बायबल शिकवले जाते. याला हिंदूंनी संघटिपणे विरोध करणे आवश्यक आहे. तरी त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ मे या दिवशी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.’’ |
या प्रसंगी श्री. बापू ढगे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर माझ्यात आमूलाग्र पालट जाणवत आहे. त्यामुळे समाजातील लोकांची नुसती इच्छा असून उपयोग नाही, तर हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.’’ |
सोलापूर येथील व्यापारी श्री. विठुराय व्यंकटेश हे दिंडीमध्ये भगवा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, दिंडी अतीशय सुंदर आणि शिस्तबद्ध होती. धार्मिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणारी दिंडी साकारणारे आयोजक आणि उपस्थितांचे अभिनंदन ! |
क्षणचित्रे
१. अनेक पालक त्यांच्या मुलांना राष्ट्रपुरुषांच्या व्यक्तीरेखेमध्ये दिंडीमध्ये घेऊन आले होते.
२. अनेक धर्मप्रेमी, हिंदु नागरिक यांनी स्वत: दिंडीची छायाचित्रे घेऊन, तसेच ध्वनीचित्रीकरण करून ते त्यांच्या ‘डी.पी.’, तसेच ‘स्टेटस्’ला ठेवले होते.
३. दिंडीमध्ये दिल्या जाणाऱ्या घोषणा पाहून रस्त्यावर उभे असलेल्या ४० ते ५० लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.
संपादकीय भूमिकाहिंदु एकता दिंडीवर उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी करणारे हितचिंतक हीच राष्ट्र-धर्म कार्यातील खरी शक्ती होय ! |