‘भारतात ब्राह्मण समाजाचे मंदिरांवर १०० टक्के आरक्षण आहे’, असे म्हणणाऱ्यांनो, सत्य समजून घ्या !
‘भारतात ब्राह्मण समाजाचे मंदिरांवर १०० टक्के आरक्षण आहे’, अशी अफवा काही लोक मुद्दामहून पसरवतात आणि त्यावरून ब्राह्मणांवर टीका केली जाते. खरे तर बहुतांश ठिकाणी देवाचे पुजारी म्हणून गुरव या इतर मागासवर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडणाऱ्या पुजाऱ्यांची, तर अन्य ठिकाणी विविध समाजातील लोकांची पुजारी म्हणून नेमणूक केलेली आहे. अशा नियुक्त केलेल्या पुजाऱ्यांची माहिती येथे देत आहोत.
१. तुळजापूर येथील श्री भवानीदेवीचे पुजारी हे वंशपरंपरागत मराठा समाजाचे आहेत, तसेच तेथे मराठे भोपी आहेत.
२. बिरोबादेवाचे पुजारी धनगर, मरीमातादेवीचे पुजारी मातंग, नवनाथांचे पुजारी गोसावी, तर खंडोबाचे गोंधळी हे गोंधळी समाजाचे आहेत.
३. कर्नाटकात जंगम लोक पौरोहित्य करतात आणि ते अनुसूचित जमाती (एस्.टी.)मध्ये येतात.
४. आंध्रप्रदेशमध्ये पंतुलू समाजाचे लोक पौरोहित्य करतात आणि ते भटक्या जमाती (एन्.टी.)मध्ये आहेत.
५. मैसुरू ते कन्याकुमारी भागात लिंगायत स्वतःला ब्राह्मण समजून पौरोहित्य करतात.
६. कोल्हापूरच्या जोतिबाचे पुजारी गुरव आहेत.
७. देशातील १२ ज्योतिर्लिगांपैकी ८ ठिकाणी ब्राह्मण पौरोहित्य करत नाहीत. शिवाच्या मंदिरात गिरी गोसावी पौरोहित्य करतात.
८. भारतातील जेवढी काही नदीकाठची शिवमंदिरे आहेत, तेथे महादेव कोळी बेडर लोक पौरोहित्य करतात.
९. पंढरपूरमध्ये आता सर्व जातीचे पुजारी आहेत.
१०. भारतातील एकूण मोठ्या मंदिरांच्या पौरोहित्याचा विचार करता केवळ ४ टक्के ब्राह्मण जातीचे पुरोहित आहेत.
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)
खोटा प्रचार कशासाठी ?याचा अर्थ हिंदु धर्मात सर्व जातीचे लोक विविध देवतांचे पुजारी म्हणून सहस्रो वर्षांपासून आनंदाने कर्तव्य बजावत आहेत. मग मंदिरांवर ब्राह्मण, तसेच ब्राह्मणेतर जाती या सर्वांचेच पोट अवलंबून नाही का ? मग ‘देवामुळे केवळ ब्राह्मणांचे पोट भरते’, हा खोटा प्रचार कशासाठी करण्यात येत आहे ? |