काळ्या रंगाचे कपडे परिधान करून स्वयंपाक केल्यास पदार्थ अनिष्ट शक्तींनी भारीत होऊन तो देवतेचे तत्त्व आकृष्ट करू न शकणे
आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
(भाग ७)
‘सध्या अनेक महिला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून स्वयंपाक करतात. काळ्या रंगाच्या वस्त्रांना हिंदु धर्मात केवळ काही विशिष्ट कारणासाठी आणि विशिष्ट लोकांसाठी किंवा विशिष्ट पंथालाच परिधान करण्याची अनुमती आहे. ‘सामान्य हिंदूंनी काळे कपडे परिधान करू नयेत’, असे शास्त्रात सांगितले आहे; परंतु अज्ञानामुळे किंवा आधुनिक होण्याच्या शर्यतीत आज बहुतांश महिला सर्रास काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. केवळ एवढेच नाही, तर तसे कपडे परिधान करून त्या स्वयंपाकही करतात. त्यामुळे ते खाद्यपदार्थ अपवित्र आणि अनिष्ट शक्तींनी किंवा तमोगुणाने भारीत होतात. त्यांमध्ये त्रासदायक शक्ती असल्यामुळे ते पदार्थ देवतेचे तत्त्व आकृष्ट करू शकत नाहीत. पूर्वीच्या काळी जर एखाद्या महिलेने काळ्या रंगाचे कपडे परिधान करून स्वयंपाक केला, तर ते पदार्थ कुणीही ग्रहण करत नसे. स्वयंपाकाला जर नैवेद्याच्या रूपात बनवायचे असेल, तर आचारधर्माचे पालन करायला शिकावे !’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (३१.१.२०२२)