काश्मिरी हिंदूंना वाचवायचे असेल, तर ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला !
फारूख अब्दुल्ला यांची हास्यास्पद मागणी !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – ‘द कश्मीर फाइल्स’ या निराधार चित्रपटाने देशात केवळ द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. (या चित्रपटातून जे काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात जे घडले, त्यातील अत्यंत थोडाच भाग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अब्दुला सारख्यांना मिरच्या झोंबल्या आहेत. त्यातून ते अशी मागणी करत आहेत ! – संपादक) काश्मिरी हिंदूंवरील आक्रमणे रोखायची असतील, तर सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे. (काश्मिरी हिंदूंवर आक्रमणे रोखायची असतील, तर काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट करा, अशी मागणी अब्दुल्ला करत नाहीत. यावरून त्यांची खरी मानसिकता लक्षात येते ! – संपादक)
“Ban ‘Kashmir Files’ to save Kashmiri Pandits,” says former J&K CM Farooq Abdullah. India Today’s @ashraf_wani with details. #ITVideo #India #JammuAndKashmir #KashmirFiles #KashmiriPandits | @nabilajamal_ pic.twitter.com/21NJFOkj3E
— IndiaToday (@IndiaToday) May 16, 2022
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सत्यावर आधारित आहे का ?’, असा प्रश्न मी सरकारला विचारला होता. खरेच एखादा मुसलमान आधी एखाद्या हिंदूला मारेल आणि नंतर त्याचे रक्त भातामध्ये टाकून तो भात पत्नीला खायला देईल का ? आम्ही इतक्या खालच्या पातळीवर घसरलो आहोत का ?’ असा प्रश्नही फारूख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. (धर्मांधतेपायी इस्लामी आक्रमक किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, याला भारताचा गेल्या १ सहस्र वर्षांतील हिंदूंविरोधी आक्रमणांचा इतिहास साक्षीदार आहे. सत्य नाकारण्यापेक्षा त्याची चौकशी करण्याची मागणी अब्दुल्ला का करत नाहीत ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|