‘जमात-ए-इस्लामी’ने आतंकवादी याकूब मेमनला ठरवले ‘हुतात्मा’ !
कोच्चि (केरळ) – केरळमध्ये वितरित करण्यात येणारे ‘जमात-ए-इस्लामी’ या मुसलमान संघटनेच्या दिनदर्शिकेत वर्ष १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमन याला वर्ष २०१५ मध्ये दिलेल्या मृत्यूदंडाच्या दिनांकाचा उल्लेख करून तो ‘हुतात्मा’ असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासह या दिनदर्शिकेत भारताचा स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन यांचा उल्लेखच नसल्याचे दिसून आले आहे. तथापि जिन्ना यांच्या मृत्यूचा दिनांक मात्र छापला आहे. यातून या संघटनेची निष्ठा कुणाशी आहे, याचे वेगळे पुरावे देण्याची आवश्यकता नाही, असे ट्वीट येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रथीश विश्वनाथ यांनी केली.
In the calendar of Jamat Islami circulated at Kerala, Yakub Memon,a terrorist hanged by Indian govt for plotting Mumbai Blasts, is a martyr .No mention of Independence day or republic day, but day Jinnah died is special. What more proof to understand the loyalty of these lot. pic.twitter.com/6JdwQGiR85
— Pratheesh Viswanath (@pratheesh_Hind) May 15, 2022
संपादकीय भूमिका
|