लोणावळा (पुणे) येथे पोलीस निरीक्षकासह दोघांवर लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !
लोणावळा (जिल्हा पुणे) – येथील एका तक्रारदाराच्या गॅस आस्थापनावर कारवाई न करण्यासाठी मध्यस्थाकडून पोलिसांनी २ लाख रुपयांची मागणी केली; परंतु तडजोडीअंती दीड लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे साहाय्यक फौजदार कुतुबुद्दीन खान आणि खासगी व्यक्ती यासीन शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने १४ मे या दिवशी अटक करण्यात आली. त्यांना लाच स्वीकारण्याविषयी प्रोत्साहन दिले म्हणून पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यात खान आणि शेख यांना अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकालाचखोरी करणारे पोलीस कधी कायदा-सुव्यवस्था राखू शकतील का ? |