शिवसेनेने संभाजीनगर नावाचा ठराव मांडल्यास संमतीसाठी प्रयत्न करू ! – भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
संभाजीनगर – शिवसेनेने विधानसभेत औरंगाबादऐवजी ‘संभाजीनगर’ नावाचा ठराव घ्यावा आणि केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव संमत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी १४ मे या दिवशी येथे केले. गेल्या अनेक वर्षांपासून ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा ‘संभाजीनगर’ नामांतराचा अजेंडा आहे; मात्र मुसलमान मतदारांना दुखावून हा निर्णय घेण्याचे धाडस अद्याप एकानेही दाखवलेले नाही.