इंधन निर्यातीवर बंधने आल्याने जर्मनीत वाहनांवर वेगमर्यादा येणार !
बर्लिन (जर्मनी) – अधिक वेगामुळे अधिक इंधन लागत असल्याने जर्मनीत वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याचा निर्णय तेथील विविध राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांनी एकमुखाने घेतला. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीला तेल आणि वायू मिळण्यावर बंधने आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. इंधन बचतीसाठी हा उपाय बिनखर्चिक, लगेच अमलात आणला जाऊ शकणारा आणि परिणामकारक असल्याचे मंत्र्यांनी एका संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. जर्मनी ही तेल आणि वायू यांच्यासंदर्भात रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. रशियावर आर्थिक निर्बंध लादल्याने जर्मनीने वरील उपाय काढला.