जळगाव पोलिसांकडून मृताच्या कुटुंबियांवर लाठीमार !
आर्थिक साहाय्याची मागणी करत कुटुंबियांकडून मृतदेह घरी नेण्यास नकार
जळगाव – जळगाव जिल्हा दूध संघात काम करणारे कर्मचारी धनराज सुरेश बिरारी (वय ३७ वर्षे) यांचा मुक्ताईनगरजवळ भीषण अपघातात १३ मेच्या पहाटे मृत्यू झाला. आर्थिक साहाय्यासाठी मृताच्या कुटुंबियांनी मृतदेह दूध संघाच्या आवारातच आणला. ५ घंटे उलटूनही साहाय्य न मिळाल्याने संतप्त नातेवाइकांनी मृतदेह तसाच ठेवला होता.
या वेळी पोलिसांनी मृताच्या कुटुंबियांवरच लाठीमार केला. यात मृतदेहाचीही विटंबना झाली. लाठीमारामुळे पळापळ झाली. शेवटी पोलिसांनाच मृतदेह त्याच्या घरी न्यावा लागला. संपूर्ण प्रकरणामुळे घटनास्थळी पुष्कळ तणाव निर्माण झाला.
संपादकीय भूमिकापोलिसांची असंवेदनशीलता जाणा ! जनतेने असे कृत्य करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करण्याची सरकारकडे मागणी करायला हवी ! |