सरकारचे एकतरी खाते आदर्श आहे का ?
‘प्रतिवर्षी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडल्यामुळे नद्यांना महापूर येतो, तर कोकणात दरडी कोसळून निष्पाप लोकांचे जीव जातात. पावसाळ्यापूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सिद्ध असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर ‘आपत्ती व्यवस्थापन नुसते नावापुरते आहे का ?’, असाच प्रश्न पडतो. ‘आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं’, अशी अवस्था आपत्ती व्यवस्थापनाची झाली आहे.’
– श्री. सचिन कौलकर, मुंबई